तळोदा l प्रतिनिधी-
शहादा तळोदा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते बोरद परिसरातील मालदा येथे विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
पेसा निधी अंतर्गत गावात रस्ता काँक्रीटीकरण करणे त्याचबरोबर, आमदार निधीतून २ हायमस्ट लॅम्प बसवणे, त्याचबरोबर १५ वा वित्त आयोगांतर्गत मिनी वाटर टॅंक तसेच गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी गाव हौद चे बांधकाम व गावात सामूहिक नळ जोडणीच्या कामाचे उदघाटन राजेश पाडवी व सरपंच करुणा पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विठ्ठल बागले, विरसिंग पाडवी,गोपी पावरा पोलीस पाटील सखाराम ठाकरे,भगतसिंग खर्डे,फकिरा खर्डे,बेताब पावरा, ईश्वर खर्डे,हरीश खर्डे,मगन खर्डे,रोहिदास पावरा, देविदास खर्डे,अण्णा खर्डे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.








