Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात 2 व 3 नोव्हेंबर रोजी लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन :जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
October 30, 2021
in आरोग्य
0
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदारांनी नाव नोंदवावे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी सण, उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी 2 व 3 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात विशेष लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले आहे.

या मोहिमेअंतर्गत लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभागासह इतर विभाग, लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. लहान गावात 100 टक्के लसीकरण करावेत. गाव, पाडे, तालुका तसेच प्रभाग निहाय या विशेष शिबीरांचे आयोजन करावे. त्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती करावी. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून कोविड नियंत्रणासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. लसीकरणासाठी प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत असून अद्यापही ज्या नागरीकांना लसीकरणाचा पहिला डोस घेतला नसेल त्यांनी पहिला तर ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. यामुळे कोविड विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.

लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल त्यांना लसीकरणासाठी प्रेरीत करावे, तसेच कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह, सरंपच, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगून लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. लसीकरण मोहिमेत अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी केले आहे.
लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यात उपलब्ध
लसीचा तालुकानिहाय साठा

जिल्ह्यात तालुकास्तरावर कोविशिल्ड लसीचा उपलब्ध साठा पुढीलप्रमाणे नंदुरबार 10,450 डोस, नवापूर 13,640 डोस, शहादा 16,080 डोस, तळोदा 3,930 डोस, धडगाव 12,640 डोस, अक्कलकुवा 14,810 डोस, जिल्हा रुग्णालय 410 डोस, जिल्हा लस भांडार 57,500 तर नाशिक आरव्हीएस कडून 24,000 लसीचे डोस असे एकूण 1,29,460 डोस शिल्लक आहेत तर कोव्हक्सिन लसीचे नंदुरबार 1,680 डोस, नवापूर 2,580 डोस, शहादा 1000 डोस, तळोदा 1130 डोस, धडगाव 425 डोस, अक्कलकुवा 320 डोस, जिल्हा रुग्णालय 225 डोस, जिल्हा लस भांडार 13,280 डोस तर नाशिक आरव्हीएस कडून 5,280 लसीचे डोस असे एकूण 20,640 डोस शिल्लक आहेत.

लसीकरणासाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे. यामोहिमेसाठी 2 नोव्हेंबर रोजी 384 तर दुसऱ्या दिवशी 389 बुथ लसीकरणासाठी कार्यान्वीत करण्यात येतील. या दोन्ही दिवसासाठीचे तालुकानिहाय बुध असे, नंदुरबार- 80,85. तळोदा 43,43. शहादा 58,58. नवापूर 52,52. अक्राणी 80,80, धडगाव 71,71.

बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्याच्या पायथ्याशी शेकडो हातांना मिळाला रोजगार, बांबूपासून बनविलेल्या आकर्षक वस्तू पोहचल्या बाजारात; झिरी बनतेय बांबूचे आगार

Next Post

विशेष लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवा, पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे नागरिकांना आवाहन

Next Post
विशेष लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवा, पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे नागरिकांना आवाहन

विशेष लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवा, पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे नागरिकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add