Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरेंनी केली गरिबांची दिवाळी गोड, रायलाल नगरात मोफत साखर वाटप

team by team
October 30, 2021
in राजकीय
0
शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरेंनी केली गरिबांची दिवाळी गोड, रायलाल नगरात मोफत साखर वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी-
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत दिलीपराव मोरे यांनी गोर गरिबांची दिवाळी गोड केलेली आहे. शहरातील कंजरवाडा परिसरातील रायलाल नगरातील गरजूंना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात शेकडोंवर महिलांनी लाभ घेतला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रमुख डॉ. विक्रांत मोरे म्हणाले, सध्या दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडलेली आहे. पेट्रोल १५० रुपये तर डिझेल १०० रुपयांवर जाईल. प्रत्येक वस्तू महागाईच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. गोर गरिबांची दिवाळी गोड व्हावी त्यामुळे मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याप्रसंगी नगरसेवक मनोज चव्हाण, माजी नगरसेवक अर्जुन मराठे, शहर उपप्रमुख लखन माळी, आनंद पाटील,युवती सेनेच्या काजल मच्छले, ज्ञानेश्वर गुमाने,राजेश मच्छले, प्रकाश मच्छले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेली आहे. सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले आहे. शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना बोनस देण्यात मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे.ठीकठिकाणी दिवाळीच्या फराळाची लगबग दिसून येत आहे. गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे यांनी आज शुक्रवार (दि. 29) रोजी शहरातील कंजरवाडा भागातील रायलाल नगरात मोफत साखरचे वितरण करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडोंवर महिलांनी मोफत साखरेचा लाभ घेतला. दिवाळीच्या गोडवा पसरल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हानिर्मितीनंतर पहिल्यांदाच शिक्षकांना मिळणार निवडश्रेणीचा लाभ

Next Post

खोंडामळी ग्रामपंचायतीकडे थकबाकीमुळे पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा केला खंडित, ग्रामस्थांची पाण्यासाठी दहादिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add