शहादा l प्रतिनिधी
शहरातील सरस्वती कॉलनीत गुरुवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान इलेक्ट्रिक चालणाऱ्या चालत्या दुचाकी वाहनात स्पार्किंग झाल्यामुळे लागलेल्या आगीत नवी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली होती.दरम्यान यावेळी वाहनाच्या डिक्कित ठेवलेल्या एक लाख रुपयांसह एक लाख 72 हजार रुपयांचे नुकसान झाले असून हे नुकसान कंपनीने भरून द्यायची मागणी वाहन मालक याने केली आहे.
सध्या पेट्रोल यांचे दर दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहे. गावाचा – गावात लहान- लहान व्यवसाय मोठा व्यवसाय असो यांना शहरात दुचाकी वाहनाने मालाची ने-आन करण्यासाठी दुचाकी वाहनाची आवश्यकता असते. तसेच लगतच्या खेड्यांना संपर्क करण्यासाठी दुचाकी वाहन सोईचे ठरत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढत असताना पेट्रोलवर चालणारे वाहन वापरणे सर्व सामान्य नागरिकांना कठीण झाले आहे. पर्याय म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून मार्केट मध्ये बॅटरीवर चालणाऱ्या वाहन खरेदी कडे ग्राहकांचा कल आहे. बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्या वाहनांची किंमत ७० ते ७५ हजारा पर्यंत किंमत आहे. यात पेट्रोल टाकण्याची कुठली आवश्यकता नाही पेट्रोल चालणाऱ्या वाहनाला पर्याय म्हणून अनेक दुचाकी वाहन चालक आता बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाला पर्याय म्हणून खरेदी करीत आहेत त्यातच शहादा शहरातील मेमन कॉलनीतील जुनेद आणि मेमन यांनी तीन महिन्यापूर्वी बॅटरीवर चालणारी सुमारे 72 हजार रुपये किमतीचे वाहन खरेदी केले होते. जुनेद मेमन यांचा सोडा बाटली व पाण्याच्या व्यवसाय असल्याने शहरात वसाहतीत ग्राहकांची संपर्क करण्यासाठी बॅटरीवर चालणारी दुचाकी मोटरसायकल ही सोयीचे असल्याने त्यांनी ती खरेदी केली. गुरुवारी सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान जुनेद मेमन बॅटरीवर चालणारी मोटर सायकल व तिच्या डिक्कीत सुमारे एक लाख रुपये कॅश घेऊन सरस्वती कॉलनी परिसरातून जात असताना वाहनातील गाडीत स्पार्किंग झाल्यावर अचानक पेट घेतला बघता बघता अवघ्या दहा मिनिटातच वाहनाची राखरांगोळी झाली.बॅटरीवर चालणारी मोटर सायकल ची किंमत रुपये 72 हजार व वाहनाचा डिक्कित ठेवलेले रोख एक लाख रुपये असा 72 हजाराचे नुकसान झाले. सदरचे नुकसान कंपनीने भरून देण्याची मागणी जुनेद मेमन यांनी केले.








