नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेचे विरोधी नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा पालिकेचा ठराव रद्द करण्याची नगरसेवक चारुदत्त कळवणकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील सर्व सामान्य जनतेशी संवाद नसल्याने नगरपालीकेचा कारभार एक व्यक्ती जसा सांगेल तसा हुकुमशाही पध्दतीने चालला आहे.नंदुरबार नगरपालिकेला आर्थिक फायद्याचे दुकान बनवून टाकले आहे व याच्या विरोधात कोणीही आवाज उठवल्यास त्याला गुंडगीरी चे नाव देत त्यांना अपात्र करण्याचा बेकायदेशीर ठराव केला जात आहे.नंदुरबार शहरात दैनंदिन साफसफाईत होत असलेला भ्रष्टाचार या सर्व विषयाला कारणीभुत आहे.साफसफाई अभावी जागोजागी उकिरडे मुळेच कुत्रे व मोकाट गुरांचा हैदोस शहरात दिसुन येत आहे परिणामी लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय व याला काही लोक बळी ही पडले आहेत. तरीही विरोधकांकडे मुद्दे नसल्याचे सांगत स्वत:हाचा भ्रष्टाचार लपवण्याचे प्रयत्न होत आहेत.तरी सत्ताधारींना व त्यांच्या नेत्यांना आम्ही आवाहन करतो की उंटावरून शेळ्या हाकलायचे प्रकार बंद करून नंदुरबार शहरात समस्याकडे लक्ष देवून नगरपालिकेचा कारभाराचे नियोजन करावे अन्यथा आगामी काळात नंदनगरीची जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
नंदुरबार नगरपालिकेतील संख्या बळाचा वापर करून विरोधी नगरसेवकांना अपात्र करण्याचा बेकायदीशीर ठराव नगरपालिका अधिनीयम १९६५ च्या कलम ३०८ प्रमाणे रद्द करावा,अर्थसंकल्पात तरतुद असलेल्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा पैश्यांचा वापर करत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,मोकाट गुरांचा प्रश्नाचे नियोजन करावे, नगरपालिकेतील सीसीटिव्ही फुटेज छेडछाड करण्यापुर्वी ताब्यात घ्यावे,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीराला खाजगी कार्यालय बनवू पाहणाऱ्यांच्या तावडीतुन मोकळे करावे,कै बटेसिंगभैय्या रघुवंशी व्यापारी संकुलातले गाळा क्र १ चे बेकायदेशीर हस्तांतरण रोखावे, नगरसेवकांना अपात्र करण्याचा बेकायदेशीर ठराव व नगरपालिकेच्या हिताचे निर्णय न घेणार्या नगराध्यक्षा यांना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ५१-१-अ व सत्ताधारी नगरसेवकांना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ४४ अनन्वे कारवाई करत सदस्यत्व रद्द करणे व नगरपालिकेच्या यापुढील सर्व सभांना पोलीस बंदोबस्त देवून नगरपालिकेचे कामकाज निर्भयपणे चालवावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना भाजपा नगरसेवक व विरोधी पक्ष नेते चारूदत्त कळवणकर,आनंद माळी,प्रशांत चौधरी,पृथ्वीराज जैन,संगिताताई सोनवणे,सिंधुबाई माळी,कमल ठाकुर,संगिताताई वसईकर यांनी दिले








