Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

team by team
October 14, 2026
in राज्य
0
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 च्या माध्यमातून मदतीचा आधार मिळत आहे. या योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 1 हजार 343 पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी 12ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, एस. वाय. पुरी यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण 28 हजार 372 थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे 24 जुलै 2026 रोजी 17 हजार 998 शेतकऱ्यांची पहिली यादी, 11 सप्टेंबर 2026 रोजी 1 हजार 345 शेतकऱ्यांची दुसरी आणि 12 ऑक्टोबर 2026 रोजी 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. आतापर्यंत एकूण 20 हजार 686 शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी लाभार्थ्यांची यादी संबंधित बॅक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

योजनेतील पात्र शेतकऱ्यांची कर्जबाकी 31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची 31 मार्च, 2026 रोजी कर्जथकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे. मृत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

 

लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत तपासून विहित प्रक्रिया पूर्ण करावी व योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

Next Post

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

Next Post
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add