Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथून पोलीसांच्या हातावर तुरी देत फरार झालेला आरोपीला पोलीसांनी जळगाव जिल्ह्यातून केली अटक

team by team
October 23, 2021
in क्राईम
0
म्हसावद येथून पोलीसांच्या हातावर तुरी देत फरार झालेला आरोपीला पोलीसांनी जळगाव जिल्ह्यातून केली अटक
नंदुरबार l प्रतिनिधी
म्हसावद येथून पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून फरार झालेल्या चोरीच्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जिल्ह्यातील सावदा येथून ४८ तासाच्या आत अटक केली.असून त्याला म्हसावद पोलिसांच्या ताब्यात दिले
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 20 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7.30 वा . सुमारास शहादा पोलीस ठाण्यातील चोरीच्या अटकेतील आरोपी  राजा कपुरदास बैरागी रा . आमोदे ता . शिरपुर जि . धुळे यास ग्रामीण रुग्णालय , म्हसावद येथे नियमीत वैद्यकिय तपासणी करीता आणले असता आरोपी हा पोलीसांच्या हाताला झटका मारुन ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथून पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून फरार झाला होता.याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
 घडलेला प्रकार अतिशय गंभीर होता , म्हणून पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील  अमंलदारांचे तसेच शहादा पोलीस ठाणे आणि म्हसावद पोलीस ठाणे यांचे वेगवेगळे 5 पथक तयार केले.
 वरिष्ठांच्या  सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेची पथके शिरपुर , धुळे , नागपुर येथे रवाना केले . समाज माध्यमांवर देखील आरोपीचा फोटो व त्याबाबत माहिती प्रसारीत करण्यात आली , परंतु कोणत्याही पथकाला आरोपी ताब्यात घेणेबाबत यश मिळत नव्हते . एका अनोळखीने दि.21 ऑक्टोंबर रोजी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना एका  फोनद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीसांच्या ताब्यातुन पळालेला आरोपी सारखाच दिसणारा एक इसम जळगांव येथे फिरत असल्याचे सांगितले , परंतु त्याने इतर कोणतीही उपयुक्त माहिती दिली नाही . या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक जळगांव येथे रवाना केले . मिळालेली माहिती अतिशय त्रोटक स्वरुपाची होती त्यामुळे पथकाला आरोपीताचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जिल्ह्यातील सावदा येथे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दि. 23 ऑक्टोंबर  रोजी मध्यरात्री कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर झोपलेला स्थितीत होता , परंतु त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो पळुन जावू लागला . त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले व नंदुरबार येथे आणून पूढील कारवाईकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील ,  अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे , विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने डॉ.राकेश पाटील सन्मानीत

Next Post

रासेयो तर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम

Next Post
रासेयो तर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम

रासेयो तर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add