नंदुरबार l प्रतिनिधी-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यालयात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या सूचनेनुसार आयोजित या निषेध कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मोहन माळी, शहराध्यक्ष निंबा माळी, महिला शहराध्यक्ष सुनीता शिंपी, प्रदेश पदाधिकारी मयूरी ब्राह्मणे, जिल्हा सचिव वैशाली चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश जैन, मोहन ढोणे, राजू पवार, सागर पाटील, मनोज चौधरी, राजा ठाकरे, रवींद्र जावरे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण दूषित होत असल्याचे सांगितले.








