नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी अनिल दौलत पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार तहसीलदार प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार सुरेखा जगताप , नायब तहसीलदार मदन कावळे यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, सहाय्यक महसुलाधिकारी, महसूल सहाय्यक ग्राम वसूल अधिकारी व महसूल सेवक उपस्थितीत होते. खोंडामळी ता नंदुरबार येथील मंडळ अधिकारी श्री. पानपाटील तहसील कार्यालयात २७ वर्षे सेवेत विविध पदावर काम केले. श्री. पानपाटील हे २४ एप्रिल १९९९ रोजी पथराई ता. नंदुरबार सजेवर तलाठी म्हणून प्रथम नियुक्ती झाली सलग दहा वर्ष पथराई सजेवर काम केले त्यानंतर २००९ साली जुनमोहिदा सजेवर बदली झाली त्यानंतर २०१२ला मोगराणी ता.नवापूर येथे बदली झाली त्यानंतर २०१५ ला करणखेडा ता.नंदुरबार बदली झाली सन २०१६ ला प्रमोशन झाल्यानंतर तहसील कार्यालय धडगाव येथे अव्वल कारकून म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर २०२१ पासून मंडळ अधिकारी खोंडामळी या पदावर रुजू झाले तेथेच ते सेवानिवृत झाले.त्याची एकूण सेवा २७ वर्ष झाले असून त्यांनी तलाठी, अव्वल कारकून, मंडळाधिकारी आदि पदावर काम केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी ग्राम महसूल अधिकारी नरेंद्र महाले, झनक गायकवाड, नितीन माळी, श्रीमती वैशाली काकुळदे यांनी मोलाचे सहकार्य केले.








