नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन जनजागृती शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व समाज कल्याण विभाग तथा जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नरबळी अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन संबंधित जनजागृती कार्यक्रम इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शनासाठी विनोद बोरसे व प्रमोद भामरे यांनी मनोरंजनात्मक जादूचे प्रयोगा द्वारे विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक आर.एच.बागुल यांनी जादूटोणाविरोधी कायदा २०१३ अंतर्गत अंधश्रद्धा आणि बुवा बाजीला आळा घालवण्यासाठी आणि नरबळी सारख्या प्रथांना रोखण्यासाठी तसेच लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन चमत्कार किंवा जादू टोण्याच्या दावा करून फसवणूक करणाऱ्या ढोंगी बाबांवर कार्यवाही झाली पाहिजे व समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन होणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून सक्रिय सहभाग घेण्यात आला व त्यांच्याशी संवाद साधण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. जी. पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार एन.बी. पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







