Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

team by team
July 27, 2026
in क्राईम
0
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार शहरातील पाण्याच्या मोटारी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या सात चोरीच्या पाण्याच्या मोटारी जप्त करण्यात यश मिळविले आहे. आरोपीने नंदुरबार शहर परिसरात अशाच प्रकारच्या सात चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देसाईपुरा परिसरातील रहिवासी रविंद्र दंगल मराठे यांच्या घराच्या ओट्यावरून १९ जुलै २०२६ रोजी रात्री ते २० जुलै २०२६ रोजी पहाटेच्या दरम्यान सुमारे ६ हजार रुपये किमतीची शगुना कंपनीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरात अशा प्रकारच्या मोटार चोरीच्या तक्रारी वाढत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास गांभीर्याने हाती घेतला.

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रशेखर नथ्थू मेघश्याम (रा. चिंचपाडा, भिलाटी, नंदुरबार) याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने नंदुरबार शहर परिसरात पाण्याच्या मोटारी चोरीचे एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या विविध कंपन्यांच्या सात पाण्याच्या मोटारी हस्तगत केल्या आहेत. मात्र, काही मोटारींचे मालक अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे अलीकडील काळात ज्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरीस गेल्या असतील त्यांनी मालकीचे कागदपत्र किंवा पुराव्यासह नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने नंदुरबार शहर पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, गणेश मराठे, पोलीस हवालदार जगदीश पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल ललित गायकवाड, अमित भरवाड, राहुल राठोड, राजेंद्र कटके, रमेश पगारे, विवेक ठाकरे, अनिल बसावे, नरेंद्र पाटील आणि निंबा वाघमोडे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जगदीश पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

Next Post

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

Next Post
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add