नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के . डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्राचार्य शरद पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर गवळे यांनी केले. या प्रसंगी स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध वाक्य “उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका”. “गिव्ह मी अ हंड्रेड ऑफ नचिकेता आय विल चेंज द वर्ल्ड” या वाक्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन ज्ञानेश्वर गवळे व सुरेश पाडवी यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.








