Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

team by team
July 2, 2026
in राजकीय
0
जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

नंदुरबार l प्रतिनिधी :

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शहादा व नंदुरबार परिसरातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर घातली.

उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना.हसन मुश्रीफ, मा.ना.इंद्रनील नाईक,माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, आमदार सना मलिक, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शहादा तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गोदीपूरचे लोकनियुक्त सरपंच संजय जवरू पाडवी, नंदुरबारचे माजी नगरसेवक निंबा मोहन माळी, भाजपचे नगरसेवक नाना निकुंभे, माजी पं स सदस्य कृष्णा बुधा पाटील उर्फ शानाभाऊ, मा. पं स सदस्य जगदिश अशोक निकम, वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश बिऱ्हाडे, शहराध्यक्ष विश्वजित भामरे,माजी पंचायत समिती सदस्य जगदीश अशोक निकम, खरगोनचे सरपंच अनिल लोटन रावताळे, जवखेड्याचे सरपंच मणिलाल सूर्यवंशी, भागापूरचे सरपंच पंडित विश्वनाथ मोगरे, लोहाराचे सरपंच सुरेश विजय पवार, खापरखेड्याचे सरपंच सरकार रणसिंग मालचे, माजी सरपंच विलास जगन कोतवाल, वैजालीचे युवा कार्यकर्ते कल्पेश देसले, टेंभलीचे उपसरपंच काशीराम जिर्या सोनवणे, टुकीचे उपसरपंच दिलीप नबू मुसळदे तसेच मानमोड्याचे उपसरपंच भिल विक्रम सुकराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला.

यावेळी लोकप्रिय जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीतदादा मोरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मान्यवरांशी परिचय करून दिला. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागात केलेले सामाजिक व राजकीय काम, त्यांचा जनसंपर्क आणि पक्षबांधणीतील योगदान याची माहिती त्यांनी उपस्थित नेतृत्वाला करून दिली. नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्वांचा सन्मानपूर्वक पक्षात स्वागत करताना, त्यांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक सक्षम आणि व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षविस्तारासाठी निश्चितच फायदा होईल, असे सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, यामुळे शहादा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, नंदुरबार तालुका अध्यक्ष योगेश पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्रदादा कुवर, शहादा तालुकाध्यक्ष संतोष पराडके, वाजीद सैय्यद, अल्ताफ पिंजारी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, सर्फोद्दीन मक्रानी, छोटू कुवर, गोविंद भाऊ आणि योगी नाईक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

Next Post

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

Next Post
प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add