नंदुरबार l प्रतिनिधी-
कोपर्ली ता. नंदुरबार न.ता.वी. संचलित इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिवस शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगाभ्यासाने झाली. योग प्रशिक्षक चंद्रमणी बरडे व राहुल पवार यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. सर्वांनी उत्स्फूर्तपणे योगाभ्यासात सहभाग घेतला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.के.पाटील यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योग करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली.








