Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

team by team
June 23, 2026
in क्राईम
0
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

नंदुरबार  l प्रतिनिधी-

जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला होता. अनेक गुन्हे अद्याप उघडकीस न आल्याने त्यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारी ठिकाणे, वेळा, दिवस तसेच चोरीस जाणाऱ्या वाहनांच्या प्रकारांची माहिती संकलित केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार, कारागृहातून सुटलेले आरोपी तसेच संशयितांवर पाळत ठेवण्यात येत होती.

दरम्यान, २० जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, म्हसावद ते राणीपूर मार्गावर दोन संशयित इसम विनानंबर सुपर स्प्लेंडर मोटारसायकलवर फिरत आहेत. त्यानुसार तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले.

पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील रिद्धी-सिद्धी गणपती मंदिराजवळ दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे सुरेश संतोष मुखडे (वय २०, रा. राखी, ता. पानसेमल, जि. बडवाणी) व सुनील भाबल्या वळवी (वय २०, रा. चार्लीफाटा, ता. पानसेमल, जि. बडवाणी) अशी सांगितली. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने अधिक चौकशी केली असता ती धडगाव येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०९/२०२६ दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर आरोपींनी गुलाबसिंग ऊर्फ गुलच्या इसमा वळवी (रा. चार्लीफाटा, ता. खेतिया, जि. बडवाणी) व आणखी एका साथीदाराच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. चोरीची वाहने त्यांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचेही उघड झाले.

या माहितीनुसार पोलिसांनी गुलाबसिंग वळवी यालाही ताब्यात घेतले. चौघा आरोपींच्या ताब्यातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकूण २१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत सुमारे ७ लाख ५० हजार रुपये आहे.

**सहा गुन्ह्यांची उकल**

जप्त वाहनांची पडताळणी केली असता नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ६०५/२०२६, शहादा पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ५६८/२०२४ व ६९४/२०२६ तसेच उपनगर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २१/२०२६ यांसह जिल्ह्यातील एकूण सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

तसेच जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी पुणे येथील दोन, गुजरातमधील सहा, मध्यप्रदेशातील तीन आणि उत्तर प्रदेशातील एक अशा एकूण १८ मोटारसायकलींची ओळख पटली आहे. उर्वरित तीन वाहनांचे मूळ मालक व संबंधित गुन्ह्यांची माहिती शोधण्याचे काम सुरू आहे. फरार असलेल्या आणखी एका साथीदाराचा शोध घेण्यात येत असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सजन वाघ, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे तसेच पोलीस अंमलदार यशोदिप ओगले, विशाल मराठे आणि सचिन सैंदाणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी शेअर करा
Previous Post

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

Next Post

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

Next Post
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add