Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

team by team
June 5, 2026
in राजकीय
0
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पुरेशा साठ्याची उपलब्धता कायम राखावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील इंधन साठा, पुरवठा व्यवस्था आणि वितरणाची सद्यस्थिती याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत आमदार राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार व तेल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

इंधनाच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याची स्थिती, पुरवठा साखळी आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ३ जून २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ९१ पेट्रोल पंप कार्यरत असून त्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) चे २९, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) चे ३१ आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) चे ३१ पेट्रोल पंप आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी २८६.३५ किलोलीटर इंधनाची विक्री होत असून सध्या एकूण ६४०.७५ किलोलीटर इतका पेट्रोल-डिझेलचा शिल्लक साठा उपलब्ध आहे.

यामध्येएचपीसीएलकडे १५८.७२ किलोलीटर, बीपीसीएलकडे २२१.७३ किलोलीटर आणि आयओसीएलकडे २६०.३० किलोलीटर इतका साठा उपलब्ध आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या इंधन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

बैठकीत इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पुरेशा साठ्याची उपलब्धता कायम राखावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच पेट्रोल पंप चालकांशी सातत्याने समन्वय ठेवून पुरवठा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचेही निर्देश यावेळी पालकमंत्री यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक इंधन खरेदी करू नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.

आवश्यकतेनुसार तक्रार निवारण व अधिक माहितीसाठी संबंधित इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

Next Post

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

Next Post
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add