Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

team by team
May 21, 2026
in सामाजिक
0
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार l प्रतिनिधी-

“तरुणांच्या हाताला काम आणि जीवनाला नवी दिशा” या उदात्त ध्येयाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. सौ. कुमुदिनी विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून तब्बल दोन हजार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आला.

एक्सलन्सी डिजिटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, श्रीमती क.पू.पाटील माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्यात अदानी ग्रुपच्या सोलर प्रकल्पासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि संस्थेचे अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी आयुक्त सी. पी. चौधरी, भारती गिरासे , संस्थेचे कार्याध्यक्ष विजय बोरसे, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव भिका पाटील, एक्सलन्सी डिजिटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता विजय बोरसे, खोंडामळी गटाचे जि. प. सदस्य शांताराम पाटील, कि. वि. प्रसारक संस्था शिरपूरचे प्रशासकीय अधिकारी के. डी. बच्छाव , अडाणी उद्योग समूहाचे प्रतिनिधी आकाश भावसार व केतल भावसार यांच्यासह विठोबा माळी, रवींद्र बागुल , रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित राहिले होते. यावेळी मान्यवरांनी रोजगाराच्या बदलत्या संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व, औद्योगिक क्षेत्रातील अपेक्षा आणि युवकांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. “कौशल्य, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या बळावर यश निश्चित मिळते,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य रोजगार मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या आशा निर्माण झाल्या असून, सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणसंस्था आणि उद्योग क्षेत्राने उभारलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

या मेळाव्यात 329 युवकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या मेळाव्यात अडाणी सोलर ग्रुप-८५, आकाश ऑटोमोबाईल-०३, नवनाथ फर्टीलायझर-५ असे एकूण ९३ युवकाची सिलेक्शन झाले आहे. 27 मे पर्यंत नोंदणी झालेल्यांची सिलेक्शन प्रक्रिया सुरू राहील. यापुढेही येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

विजय बोरसे, कार्याध्यक्ष का.वी.प्र. संस्था ,भालेर.

बातमी शेअर करा
Previous Post

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

Next Post

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Next Post
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

July 6, 2026
प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

July 6, 2026
प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

July 6, 2026
जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add