Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

team by team
May 8, 2026
in सामाजिक
0
खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथून पुणे, मुबंईसह अनेक लांबचा महानगरसाठी खाजगी लक्झरी ट्रॅव्हल्स दररोज धावत असतात.उन्हाळ्याचा सुट्ट्यांच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्स चालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहे. उन्हाळी सुटीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्स चालक तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत. सुट्ट्यांच्या व सणासुदीला काळात नेहमीच प्रवाश्यांची आर्थिक लूट होत असते. प्रवाश्यांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर परिवहन विभागाने कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा हिंदु सेवा सहाय्य समितीने निवेदनाद्वारे दिला. मागण्यांचे निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने २०१८ मध्ये प्रवाशांची खाजगी बसेसकडून होणारी लुटमार थांबविण्यासाठी अध्यादेश काढला होता. सरकारी बसभाड्याच्या फक्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा शासनाने खाजगी ट्रॅव्हल्सना दिली होती. मात्र, सरकारच्या परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून प्रवाशांची लूट बिनबोभाटपणे सुरू आहे. निवेदनात मागण्यांमध्ये म्हटले आहे की,
१) खाजगी ट्रॅव्हल्सना एसटी बसचा साध्या बसच्या भाड्याच्या दीड पट भाडे आकारण्याची मुभा आहे. त्याप्रमाणे ट्रॅव्हल्स चालक यांनी भाडे आकारणी करावी.
२) खाजगी ट्रॅव्हल्स चालक दीडपटीपेक्षा जास्त भाडे आकारत असतील, तर प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
३) सर्व खाजगी लक्झरी बस बुकिंग ठिकाणी व वाहनतळाच्या ठिकाणी एसटी बस आणि खाजगी बसच्या भाड्याच्या तुलनात्मक दरपत्रक लावणे बंधनकारक आहे, असे दरपत्रक नंदुरबार येथे कुठेही दिसून येत नाही, तरी सर्व खाजगी लक्झरी बस यांना दरपत्रक लावणे बंधनकारक करावे तसे न करणाऱ्यांवर कारवाई करावी.
४) नंदुरबार आरटीओ विभागाने प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक (हेल्पलाईन नंबर) जारी करावा, जेणेकरून प्रवाश्यांना तक्रार करता येईल. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, चेतन राजपूत, ऍड भारती कासार,जॉली शाह, राजू चौधरी, नम्रता परदेशी, डॉ ध्वनी शाह आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

Next Post

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add