नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे ता. नंदुरबार येथील प्रगती विद्या प्रसारक संस्था नंदुरबार संचलित वि.जा. भ. ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नांदरखे येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक सागर नांमगे उपस्थित होते.
ध्वजारोहण प्राप्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी यांच्याकडून राष्ट्रगीत व राज्य गीताचे सामूहिक गायन करून घेतले तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी असाक्षर मुक्त गाव बाबत प्रतिज्ञाचे वाचन करून आपले घर व गाव साक्षर करण्याबाबत साक्षरतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर पालक व मुख्याध्यापक यांनी त्यांचे अवलोकन केले त्यानंतर निकाल घोषित करून विद्यार्थ्यांना प्रगती पत्रक वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.








