Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

team by team
April 30, 2026
in आरोग्य
0
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी-

हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि फास्ट-फूड केंद्रांमध्ये पनीर किंवा चीजच्या ऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा (दुधाव्यतिरिक्त इतर घटक वापरून बनवलेला पदार्थ) वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सपना पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

*पनीर आणि अ‍ॅनालॉग मधील फरक काय?*
अन्न सुरक्षा मानके नियमन 2011 नुसार, ‘पनीर’ हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ आहे, जो प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. याउलट ‘डेअरी अ‍ॅनालॉ’ हा दूध विरहित खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून बनवला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला तरी प्रत्यक्षात पनीर नसतो. अ‍ॅनालॉग आरोग्यास अपायकारक नसला तरी त्याची पोषणमूल्ये पनीरपेक्षा वेगळी असतात.

हॉटेल व्यावसायिकांसाठी नवीन नियम
अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 च्या तरतुदींनुसार ग्राहकांना आपण काय खातोय हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता:
• हॉटेल व्यावसायिकांनी अ‍ॅनालॉगचा वापर केल्यास तसा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड आणि बिलांवर करणे बंधनकारक आहे.
• विक्रेत्यांनी अ‍ॅनालॉगची विक्री करताना बिलावर ‘डेअरी अ‍ॅनालॉग’ किंवा ‘चीज अ‍ॅनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख करावा.
• उत्पादकांनी पॅकेजिंग आणि लेबलिंग करताना ग्राहकांची दिशाभूल होणार नाही याची दक्षता घ्यावी.

*परवान्याबाबत कडक सूचना*
अनेक अन्न व्यावसायिकांनी परवाना घेताना स्वतःचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक न देता त्रयस्थ व्यक्तीचा क्रमांक दिला आहे. अशा व्यावसायिकांनी तात्काळ स्वतःची माहिती अपडेट करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांनी दिला आहे.

*ग्राहकांसाठी आवाहन*
1. पॅकेटवरील लेबल तपासा आणि ‘अ‍ॅनालॉग’ असा उल्लेख आहे का ते पहा.
2. सुटे पनीर घेताना ते शुद्ध दुधाचे असल्याची खात्री करा आणि संशय आल्यास बिल मागा.
3. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर आणि अ‍ॅनालॉग हे स्वतंत्र पदार्थ असल्याची खात्री करा.

तक्रारीसाठी संपर्क: जर कोणत्याही ग्राहकाची अशा प्रकारे दिशाभूल होत असेल, तर त्यांनी प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Next Post

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

Next Post
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add