Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

team by team
April 28, 2026
in राजकीय
0
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन म्हणजे राष्ट्रसेवा आणि समाजसेवेच्या भव्य कार्याची पायाभरणी आहे. या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती समर्पित भाव उंचावणारे कार्य निश्चितच वेगाने घडेल; अशा शब्दात माजी मंत्री तथा विद्यमान भाजपाचे आ. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूच्या भूमिपूजनाला शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री देवदत्त जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावीत यांच्या हस्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन पार पडले. त्याप्रसंगी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्व उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांना घेऊन संघर्ष करण्यासोबतच तरुणाईला व्यक्तिमत्त्व विकासाचे व राष्ट्रप्रेमाचे बाळकडू देण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. हाच राष्ट्रसेवा व समाजसेवेचा व्यापक विचार समोर ठेवून वैयक्तिक जीवनात स्थिर झालेल्या जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘अक्षर बहुउद्देशीय विकास प्रतिष्ठान’ ही विश्वस्त संस्था स्थापन केली आहे. संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या संचलनासाठी अद्ययावत कार्यालयाची व स्वतंत्र वास्तूची उभारणी सुरू करण्यात येत आहे.

त्या निर्माणाधिन कार्यालयाचे भूमिपूजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री देवदत्त जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावीत यांच्या हस्ते पार पडले. म्हाडा कॉलनी, जी.टी.पी. कॉलेजच्या शेजारी, नंदुरबार येथे हे भूमिपूजन करण्यात आले. अभाविप प्रदेश उपाध्यक्षअमोल मराठे , हिम्मतराव चव्हाण, अक्षर बहुद्देशीय विकास प्रतिष्ठान, नंदुरबार चे अध्यक्ष डॉ. गिरीश महाजन, शहर अध्यक्ष भूषण देशपांडे आणि शहरसहमंत्री ओम येवले तसेच संचालक मंडळातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक गिरीश महाजन यांनी तर मनोगत संतोष पाटील, दाज्या पावरा, प्रा. दिनेश खरात आदींनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

Next Post

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

Next Post
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add