Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

team by team
April 25, 2026
in राजकीय
0
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना सहाय्यक उपकरणांच्या लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या ‘अलिमको’ अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराला आजपासून सुरुवात झाली असून, गुरुवारी पहिल्याच दिवशी १०० रुग्णांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.

तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेविका सोनिया राजपूत,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख पप्पू गिरासे,वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पावरा, सुनील गिरासे आदी उपस्थित होते.

या तीन दिवसीय शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सखोल तपासणी करण्यात येईल. शिबिरात तपासणी झाल्यानंतर शासनाच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना पुढील कालावधीत विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

व्हील चेअर आणि बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल (८०% पेक्षा जास्त अस्थिव्यंग असलेल्यांसाठी) ,कानाचे मशीन, कुबडी, काठी आणि सीपी चेअर,अंधांसाठी स्मार्ट काठी, ब्रेल किट आणि १० वी नंतर शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन, टी एलएम किट देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेकडो ज्येष्ठ आणि दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे.

*चौकट*

*आतापर्यंत ५ हजार जणांची तपासणी*

सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना मागील कालावधीत जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन व्हावे यासाठी मागणी केली होती त्यांनी मागणीची दखल घेतली. त्यानंतर जिल्हाभरात तालुकास्तरावर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरात आतापर्यंत तब्बल ५ हजार दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात झाली. त्यातील पात्र लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात करण्यात आले आहे.३ दिवस चालणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करावी.

आ.चंद्रकांत रघुवंशी

बातमी शेअर करा
Previous Post

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

Next Post

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

Next Post
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add