Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

team by team
March 14, 2026
in राजकीय
0
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी देवी अर्थात देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासकामांसमोरील वन खात्याच्या कायद्यांचा अडसर दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. यासाठी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, अशी ठाम ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तथा ‘संसद रत्न’ डॉ. हिना गावित यांनी दिली.

गुजरात राज्यातील डेडीयापाडा येथे वसलेल्या देव मोगरा माता मंदिराच्या विश्वस्तांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची योग्य सोय व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र भवन उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र वनविभागाच्या जमिनीशी संबंधित कायदेशीर अडचणींमुळे या कामाला विलंब होत असल्याची बाब यावेळी चर्चेत आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी आणि सर्व अडसर दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन डॉ. हिना गावित यांनी दिले. तसेच मंदिर विश्वस्तांशी संवाद साधत त्यांनी मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांची वाढती संख्या आणि विकासकामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीसाठी देवीला घातले साकडे

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री तसेच भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ. हिना गावित यांनी देव मोगरा माता मंदिरात जाऊन देवीचरणी प्रार्थना केली. पारंपरिक विधीनुसार पूजन करून त्यांनी आदिवासी समाजाच्या कुलदैवताप्रती मनोभावे श्रद्धा व्यक्त केली. या प्रसंगी देव मोगरा माता मंदिराचे उपाध्यक्ष कांतीभाई कोठारी, गुरुजी दिलीपभाई वासावा, सचिव नानसिंगभाई वसावा, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष नितेश पाडवी, अमृत चौधरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

Next Post

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

Next Post
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add