नंदुरबार | प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शेती वीज बिल वसुली थांबवून तोडलेले वीज कनेक्शन जोडन्याच्या मागणीसाठी आज रोजी नंदुरबार येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या दालनात साडे तीन तास ठिय्या देण्यात आला.यावेळी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
वीज वितरण कंपनीची नंदुरबार जिल्ह्यातील हुकूमशाही पध्दतीने शेतकर्यांकडून होणारी शेती वीज बिल वसुली थांबवून तोडलेले वीज कनेक्शन जोडुन चर्चा करण्याबाबत वीज महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार शेतकर्यांकडूनजी विजबिल वसुली करण्यास सुरवात केली आहे ती कायद्यानुसार आहे. का? कारण ज्या शेतकर्यांचे शेती पुरक वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची आगावू नोटीस देण्यात आलेली नाही. किंवा त्यांना दुसर्या कोणत्याही माध्यमातून पर्व सुचना देण्यात आलेली नाही. म्हणून काल दि.२० आक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, यांनी शेतकर्यांच्या माध्यमातून नंदुरबार येथील वीज महावितरण कार्यालयातील कार्यरत असलेल्या उपकार्यकारी अभियंता यांना संपर्क करून चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती पण त्या ठिकाणी शेतकर्यांना कोणत्याही अडचणी बाबत शाश्वत उत्तर देता आले नाही शेतकरी व संघटरनेची मागणी होती की जे वीजबल वसुली करण्यासाठी कनेक्शन कट केले आहेत. ते जोडावे व पुढील मार्ग निघत नाही तोपर्यंत वसुली थांबवावी. परंतु त्यांनी काहीही निर्णय दिला नाही. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले.यावेळी सुमारे कार्यलयात सुमारे साडे तीन तास ठिय्या आंदोलन केले.यावेळी
संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले.या निवेदनात डीपी वाहतुक ठेकेदार नेमला आहे का,शेतकरी डीपी वाहतुक करून आनतांत व वाहतुक न करता बिल का पास करतात, डीपी आणली का फिल्टर त्या ट्रॅक्टरमध्ये चढवणे उतरवने हमाली शेतकरीकडे मागतात की काय? डीपी घर तुमचा ४४० होल्टेज येत काय, शेतकरींच्या शेतात मीटरच बसवल नाही मग वीज बिल वसुली कोणत्या पध्दतीने होते. शेतकरी वीजबिल भरण्यास तयार आहेत पण आज त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षत घेता त्यांना वेळ द्यावा. व महावितरण कंपनीच्या कर्मचारींनी वीज पुरवठा खंडीत करण्याचा कार्यक्रम थांबवण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर कांतीलाल पाटील, दिलीप पाटील, दारासिंग पाडवी, प्रतापसिंग, ईश्वर मराठे, भगवान पटेल, चंद्रकांत चौधरी, नरेंद्र पाटील, किरण पाटील, कल्पेश चौधरी, केदार चौधरी, प्रकाश चौधरी, वासुदेव पाटील, महेंद्र पाटील, भपेंद्र पाटील,कांतीलाल पाटील, जगदिश पाटील, मोहन पाटील आदी असंख्ये शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.








