नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. समारंभाचे उद्घाटन आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावदचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य शरद पाटील, पालक प्रतिनिधी वासुदेव पाटील,श्रीमती शीतल वळवी उपस्थित होते.
वर्षभर शाळेत विविध शालेय परीक्षा, शाळाबाह्य परीक्षा,क्रीडा स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सैनिकी प्रशिक्षणातील विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते.या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा उद्देशाने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद पाटील यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून वर्षभरात शाळेने राबविलेल्या विविध परीक्षा, स्पर्धा याविषयी सांगून शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख सादर केला.
आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.”माणसाने जीवनात नेहमी चांगलेच करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे फळही निश्चितच चांगले मिळते.”असे सांगितले.
याप्रसंगी पालक प्रतिनिधी, पालक ,विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नीलिमा वाघ यांनी केले तर प्रल्हाद संदानशिव यांनी आभार मानले. कार्यक्रमास
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








