Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

team by team
February 26, 2026
in राष्ट्रीय
0
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

नंदुरबार l प्रतिनिधी-

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना  दरमहा रुपये 3 हजार पेन्शन देण्यात येणार असून जास्तीत जास्त पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी पी.एम. किसान तथा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ही योजना शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून  18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. तसेच भू-अभिलेखांनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2 हेक्टर पर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र ठरतील.

ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना असून पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान रुपये 3 हजार निश्चित पेन्शन मिळेल.   यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या 18 ते 40 या वयानुसार दरमहा रुपये 55/- ते रुपये 200/- पर्यंत वयाच्या 60 वर्षांपर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे.  शेतकऱ्याच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र सरकार पेन्शन फंडात जमा करते.

इच्छुक शेतकरी जवळच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) किंवा ऑनलाइन पोर्टल https://www.pmkmy.gov.in  वर स्व-नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आदि कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये शेतकऱ्यांना वृद्धापकाळात निवृत्ती वेतन मिळणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असेही जिल्हा नोडल अधिकारी पी.एम. किसान तथा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

27 व 28 फेब्रूवारी रोजी नंदुरबार ग्रंथोत्सव

Next Post

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add