Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अमानुष अत्याचारानंतर महिलेची हत्या; १२ तासांत संशयित जेरबंद

team by team
February 26, 2026
in क्राईम
0
अमानुष अत्याचारानंतर महिलेची हत्या; १२ तासांत संशयित जेरबंद

नंदुरबार l प्रतिनिधी-

नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरात ५५ वर्षीय महिलेवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील संशयिताला अवघ्या १२ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

दि. २४/०२/२०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास गंगापूर ते नानगीपाडा रस्त्यालगत असलेल्या शेतात सदर महिला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची शिताफी
फिर्याद व प्राथमिक तपासात गंगापूर येथील मनिल छगन नाईक ऊर्फ टायबू (वय २३) याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. घटना घडल्यानंतर आरोपी गावातून फरार झाला होता.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (भा.पो.से.) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चिंचपाडा रेल्वे स्थानक परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत नवापूर रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व सखोल चौकशीनंतर अटक केली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही धाडसी कारवाई यशस्वी केली.

परिसरात संतापाची लाट
घटनेमुळे गंगापूर व परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी पुढील तपास वेगाने सुरू ठेवला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

Next Post

मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ; 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले

Next Post
मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ; 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले

मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ; 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add