Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
February 22, 2026
in राजकीय
0
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

सामाजिक न्याय विभागाचा अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेचा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 1 हजार पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.दरम्यान, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नगरपालिकेचा माध्यमातून कार्यालय बांधून देण्यात येईल असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

तपासणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.शहरातील यशवंत विद्यालयाचा मैदानात सामाजिक न्याय विभागाचा एलीमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरण मिळावेत यासाठी घेण्यात आलेल्या तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.रघुवंशी म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरण देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याबाबत निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेत शिबिराला परवानगी दिली.जिल्ह्यात तालुकास्तरावर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील.

आ. चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर झाल्यास दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना साहित्याची व्यवस्था त्याच दिवशी उपलब्ध होईल. त्यासाठी शिबिराची वाट बघण्याची लाभार्थ्यांना गरज राहणार नाही.प्रसंगी
कृत्रिम अवयव तज्ञ डॉ.किरण पावरा,डॉ.संकेत, डॉ.विकास शुक्ला,डॉ.विकास कुमार, दीपक सचन,पंकज पवार यांनी तपासणी केली.

तपासणीसाठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेता ५ स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. प्रत्येक कक्षात डॉक्टरांची टीम आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करीत होते. दिवसभर तपासणीसाठी गर्दी पहायला मिळाली.

*३० लाखांच्या ई -बाईक दिल्या*

दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून यापूर्वीच ३० लाखांच्या ई- बाईक देण्यात आल्याची माहिती आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यक्रम प्रसंगी दिली. याप्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी,शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, कुणाल वसावे,पप्पू गिरासे,गौरव चौधरी,सोनिया राजपूत, मनीषा वळवी,माजी नगरसेवक विलास रघुवंशी,प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.

*शिबिराला आले यात्रेचे स्वरूप*

गेल्या ८ ते १० दिवसांपासून तपासणी शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यात येत होती. नंदुरबार तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांनी आमदार कार्यालयात तपासणी पूर्व नोंदणी केली. काल शनिवारी सकाळपासूनच ग्रामीण आणि शहरी भागातून ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांसह शिबिराचा ठिकाणी दाखल होऊ लागले. दिवसभर शिबिराच्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले.

 

 

*पात्र लाभार्थ्यांना मिळतील हे उपकरणे*

शिबिरात तपासणी झालेल्या पात्र ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने देण्यात येतील. यात चाकांच्या घडीची खुर्चीचष्मा, कंबर,मान आणि गुडघ्याचा पट्टा,कमोड खुर्ची,चालण्याची काठी,श्रवण यंत्र,घडीचे वॉकर देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

Next Post

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

Next Post
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026
स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

June 4, 2026
महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add