नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व बँकांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध कर्ज योजना तसेच सुरक्षा विमा योजनांची माहिती देण्यासाठी नंदुरबार व शहादा येथे कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शिवाजी नाट्य मंदिर, नंदुरबार येथे तर 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता अन्नपूर्णा मॅरेज हॉल, पटेल रेसिडेन्सी समोर, डोंगरगाव रोड, शहादा येथे मेळावे होतील. या मेळाव्यात कृषी तसेच उद्योग विषयी कर्जाची माहिती देण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी मेळाव्यांच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी केले आहे.








