Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

team by team
January 22, 2026
in राजकीय
0
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

नवापूर तालुक्यातील मौजे बंधारे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादू गावीत यांच्या विरोधात तीन-चतुर्थांश (3/4) मताने अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, नवीन इमारत, बंधारे येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

नवापूर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच महादू गावीत यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे. 13 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी तीन-चतुर्थांश बहुमताने हा प्रस्ताव संमत केला. या अनुषंगाने, जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आदेशानुसार, अविश्वास प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ‘विशेष ग्रामसभा’ आयोजित करण्यात आली आहे.

*ग्रामसभेतील कामकाज:*
• सभेसाठी प्रचलित नियमांनुसार गणपूर्ती (कोरम) आवश्यक असेल.
• अविश्वास ठरावाला अनुसमर्थन देण्यासाठी शिरगणना (डोके मोजणी) पद्धतीने साध्या बहुमताने मतदान घेतले जाईल.
• यासाठी 01 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• या दिवशी केवळ अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान होणार असून, इतर कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही.
• ग्रामसभेत साध्या बहुमताने ठराव मंजूर झाल्यास सरपंच पद रिक्त होईल, अन्यथा सरपंच पद कायम राहील .

ग्रामस्थांनी सभेला उपस्थित राहताना राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेला कोणताही एक ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

Next Post

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

Next Post
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add