नंदुरबार l प्रतिनिधी-
शिख सांप्रदायातील हिंद की चादर श्री गुरुतेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम उपक्रमाचे धर्म जागरण समिती व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे. गुरु परंपरा आणि श्री गुरु तेग बहादूरसिंग साहेब यांचा इतिहास जन माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर हिंद की चादर या नावाने माहिती रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथयात्रेचे नंदुरबारात जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प.पू.प्रकाश चैतन्य महाराज, बाबा ग्यानी रणजीतसिंग महाराज, आनंद चैतन्य महाराज, प.पू.प्रकाश गिरी महाराज, प.पू.वसंत चैतन्य महाराज, नांदेड क्षेत्रिय नियोजन समितीचे सहअध्यक्ष तथा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, प्रांताधिकारी अंजली शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. नंदुरबार जिल्ह्यात हिंद की चादर या माहिती रथाचे आगमन झाले असता दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात बंजारा, शिख, लभाना समाजाच्या महिला, पुरुषांनी हरे राम हरे कृष्णाचे जप करीत बंजारा बोलीभाषेत भजन-किर्तन करीत कार्यक्रमाची शोभा वाढविली. बंजारा बांधवांचा पारंपारिक पोशाख जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी शिख समाजाचे धर्मगुरु गुरुनानक महाराज व बंजारा समाजाचे धर्मगुरु संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमा स्वरुप बोधचिन्हाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी शिख समाजाचे समशेरसिंग जिगरासिंग, ललकासिंग, सरदारनी उमाकोर, लभाना समाजाचे प्रतापसिंग नायक, न्यालसिंग नायक, केसरसिंग नायक, अंबालाल नायक, विनोद नायक, लिंबा नायक, बंजारा समाजाचे प्रेम चव्हाण, भावेश पवार, चैत्राम राठोड, हिंद की चादर जिल्हा कमिटीचे जिल्हा संयोजक जितेंद्र पवार, सहसंयोजक युवराज चव्हाण, किसन पवार, गंगापूर उपसरपंच कृष्णा सेठ, पत्रकार वसंत चव्हाण, नारायणपूरचे ठेकेदार प्रेम चव्हाण, शहाद्याचे रामसिंग राठोड, बालू पवार, पुरुषोत्तम चव्हाण, सुदर्शन चव्हाण, सुजल चव्हाण, जयंतीलाल महाराज, सुरज चव्हाण, विलास चव्हाण, देवा चव्हाण आदी उपस्थित होते.








