नंदुरबार l प्रतिनिधी-
का. वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ८० विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनला क्षेत्रभेट दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील यांच्या प्रयत्नाने नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या रेझिंग डे निमित्त शालेय ८० विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.
शाळेत दारुगोळा शस्त्र ओळख. पोलीस रायझिंग डे निमित्त विद्यालयात शस्त्र व दारुगोळा ओळख कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना नंदुरबार पोलीस स्टेशनच्या वतीने विविध शस्त्रे व दारुगोळा ओळख कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र साबळे, पोलीस अंमलदार राजू गावित यांनी सहकार्य समवेत उपस्थिती विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शस्त्रांची माहिती देत त्या शस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दारुगोळ्याची ओळख करून दिली. शस्त्रांचा वापर केव्हा, कसा व कोणत्या परिस्थितीत केला जातो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मधील कामकाजाचे माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेटीचा आयोजन करण्यात आले.
पोलीस स्टेशनची दैनंदिनी कामाची माहिती. पोलीस खात्यातील विविध अधिकारी, त्यांची कर्तव्ये, कायदे व त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते याविषयी विद्यार्थ्यांना जे सोप्या व समजेल अशा भाषेत माहिती दिली.
विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाची भूमिका तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुन्हा नोंद प्रक्रिया, तक्रार दाखल करण्याची पद्धत, आपत्कालीन सेवा, सायबर गुन्हे, वाहतूक नियम तसेच महिला व बालसुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस दलाचे शिस्तबद्ध जीवन, प्रशिक्षण पद्धती आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांचीही ओळख करून देण्यात आली.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होऊन पोलीस प्रशासनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदा-सुव्यवस्था, शिस्त, जबाबदारी व देशसेवेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.
विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेट प्रसंगी
पोलीस उपनिरीक्षक दिनेश साळुंखे, (PSI) सुनील भामरे, हवालदार- चुनीलाल वसावे, पोलीस नाईक जितेंद्र साबळे, महिला पोलीस नाईक अर्चना वळवी,वैशाली वळवी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही व्ही इशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य पी एस सूर्यवंशी यांनी केले.









