नंदुरबार l प्रतिनिधी-
एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्त्री शिक्षणाच्या जननी आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यवाचन आणि प्रबोधनात्मक एकांकिकेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सावित्रीबाई फुले यांची एकपात्री भूमिका सादर करणाऱ्या श्रीमती नूतन नांद्रे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी,उपप्राचार्य विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, सी.पी बोरसे आदी उपस्थित होते.ह्यात विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमात श्रीमती नूतन पाटील यांनी ‘मी सावित्री बोलतेय’ हा प्रभावी एकपात्री प्रयोग सादर केला. सावित्रीबाईंचा तोच जुना काळ, त्यांनी सोसलेले कष्ट आणि स्त्री शिक्षणासाठी दिलेला लढा या प्रयोगातून जिवंत करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी भाषण, कविता आणि चारोळ्यांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा दिला. यामध्ये प्रामुख्याने कविता वाचन कस्तुरी दिक्षीत आणि साक्षी मराठे यांनी हृदयस्पर्शी कविता सादर केल्या, तर प्राची मराठे, वैभवी पटेल, नताशा पावरा आणि प्रज्ञा पावरा,प्रांजल वळवी, चाहत पाटील हिने सावित्रीबाईंचे जीवनकार्यावर सुंदर चारोळ्या सादर केल्या.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पाचवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘बेटी हूँ मैं बेटी तारा बंनूगी’ हे सामूहिक नृत्य. या नृत्याद्वारे मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्ष या भाषणामध्ये शाळेचा प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी बालिका दिवसानिमित्त व महिला मुक्त दिवस निमित्ताने “उपग्रह बनवून राहू नका तर स्वयंप्रकाशित तारा व्हा” व इतरांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला व सावित्रीबाई फुले यांची हुबेहूब भूमिका सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याबद्दल उपशिक्षिका नूतन पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले.या अभिनयाने जणू काही प्रत्यक्ष सावित्रीबाई फुले अवतरल्या होत्या असे सर्वांनाच वाटू लागले.
या कार्यक्रमाला शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता कुवर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद दीक्षित यांनी मांडले या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.







