नंदुरबार l प्रतिनिधी-
शिक्षणाची जननी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९५व्या जयंतीनिमित्त भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार येथील माळीवाडा परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
आमच्यासारख्या लाखो-कोटी स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती असून, त्यांच्या महान कार्याची आठवण या निमित्ताने होत आहे. गोरगरीब, वंचित, पीडित आणि महिलांसाठी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. अत्यंत बिकट सामाजिक परिस्थितीत, स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही सावित्रीबाई फुले यांनी हार न मानता महिलांना शिक्षण देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्या काळातील त्यांच्या संघर्षाची खरी किंमत आज समाजाला जाणवत असून, अशा राष्ट्रमातेच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, किसन माळी, अविनाश माळी, माणिक माळी, नगरसेविका सारिका माळी, माजी नगरसेविका मंगला माळी, प्रतिमा माळी, बाबूलाल माळी, नरेंद्र माळी, रघुनाथ माळी, संतोष वसईकर , विनेश माळी, काशिनाथ माळी, रमेश माळी, राजाराम माळी, अर्जुन माळी, भटू माळी ,मोठाभाऊ माळी, दिनेश माळी, भारत माळीयांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.








