नंदुरबार l प्रतिनिधी
निवडणूक संपताच नगरपरिषदेचे नगरसेवक आता कामाला लागलेले आहेत. शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये कोट्यवधींच्या रस्ते विकास कामांना सुरुवात झाली असून, त्याचे भूमिपूजन नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचना केले आहेत.
गेल्या २ महिन्यापासून नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे आचारसंहिता लागू असल्यामुळे विकास कामांना ब्रेक लागला होता. परंतु,आता निवडणुकीची प्रक्रिया संपताच शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचना केले आहेत. शहरातील प्रभाग क्र.१ मधील संयम पार्क, मोडक नगर, सिटी पार्क,जानकी विहार,मंथन पार्क डि.के टाउन मधील रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, नगरसेवक कुणाल वसावे, नगरसेवक शितल वसावे,नगरसेवक ज्योती राजपूत,नगरसेवक दीपक कटारिया, सामाजिक कार्यकर्ते योगेश राजपूत,कमल ठाकूर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








