नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र शासनाने अवलंबलेल्या चुकीच्या धोरणाने देशातील जनता हैराण झाली आहे. त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे देशातील पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या दरवाढीत प्रचंड वाढ होत आहे. या वाढत्या महागाई विरोधात नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसे निवेदन कार्यकारी दंडाधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार बी.ओ.बोरसे यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष विजय (लल्ला मराठे) मराठे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्र शासनाने अवलंबलेल्या चुकीच्या धोरणाने देशातील जनता हैराण झाली आहे. त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे देशातील पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या दरवाढीत प्रचंड वाढ होत आहे. यामुळे देशातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरीब, शेतमजूर, कामगारांचे जीवन जगणे मुश्किलीचे झाले आहे. आधीच कोरोनासारख्या महामारीमुळे जनतेचे हातातील काम निघून गेले आहे. अशात केंद्राचे सरकार महागाई वाढवून नागरीकांना वेठीस धरत आहे. या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुबभाई शेख यांच्या आदेशाने व राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दादा मोरे यांच्या मार्गदर्शानाखाली व युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली देशातील पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या माध्यमातुन जिल्हाभरात केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे, याची दखल घेवून आपल्या स्तरावरुन वरिष्ठ पातळीवर आमचा निषेध नोंदविण्यात यावा, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देतेप्रसंगी शहराध्यक्ष विजय (लल्ला पहेलवान) मराठे, कार्याध्यक्ष कालु पैलवान, सरचिटणीस अमोल पिंपळे, संघटक जितेंद्र ठाकरे, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे आदी उपस्थित होते.








