नंदुरबार l प्रतिनिधी-
कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती दीपक मराठे, ज्येष्ठ मार्गदर्शक बी. के. पाटील, संचालक विक्रमसिंग वळवी, किशोर पाटील, ठाणसिंग राजपूत, शरदभाई पटेल, लकडु चौरे, प्रकाश माळी यांच्यासह इतर सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी राजेंद्र गुलझासिंग गिरासे, रविंद्र वानखेडे तसेच संजय वाणी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ मार्गदर्शक बी. के. पाटील, विक्रमसिंग वळवी तसेच प्रकाश माळी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवाकालावधीत केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
विशेषतः राजेंद्र गिरासे यांनी आपल्या सेवाकालात बांधकाम क्षेत्रात तसेच प्रशासकीय कामकाजात दिलेल्या योगदानाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कर्मचारी बांधवांच्या वतीने पंकज राजपूत यांनी केले. हा सोहळा अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.








