Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
November 21, 2025
in राज्य
0
नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर 2025 महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीनंतर शासनाने तातडीची मदत म्हणून 53,99,000/- रुपये (रुपये त्रेपन्न लाख नव्व्याण्णव हजार मात्र) इतक्या अनुदानाची तरतूद करून ती डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली आहे. एकूण 918 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान नोंदवले गेले असून, त्यापैकी 603 शेतकऱ्यांना 36,85,120/- रुपये (रुपये छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे वीस मात्र) अनुदान वितरित करण्यात आले आहे. शिल्लक 315 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी (E-KYC) पूर्ण केल्यास त्यांचे अनुदान तात्काळ खात्यात जमा होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशा संघवी यांनी दिली.

तालुकानिहाय मदत वाटपात अक्कलकुवा तालुक्यात 148 शेतकऱ्यांना 1,19,850 रुपये (रुपये एक लाख एकोणीस हजार आठशे पन्नास) वितरित झाले असून 87 शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. अक्राणीमध्ये 98 शेतकऱ्यांना 47,175 रुपये (रुपये सत्तेचाळीस हजार एकशे पंचाहत्तर) वाटप झाले असून 94 ई-केवायसी प्रलंबित आहेत. नंदुरबार तालुक्यात 270 शेतकऱ्यांना 17,42,270 रुपये (रुपये सतरा लाख बेचाळीस हजार दोनशे सत्तर) मिळाले असून 54 अद्यापही शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. नवापूरमध्ये 172 शेतकऱ्यांना 4,46,080 रुपये (रुपये चार लाख छेचाळीस हजार ऐंशी) अनुदान मिळाले असून 40 जणांचे ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे. शहादा तालुक्यात 77 शेतकऱ्यांना 3,51,870 रुपये (रुपये तीन लाख एकावन्न हजार आठशे सत्तर) तर तळोदा तालुक्यात 153 शेतकऱ्यांना 9,77,875 रुपये (रुपये नऊ लाख सत्याहत्तर हजार आठशे पंच्याहत्तर) मदत वितरित झाली असून अनुक्रमे 21 व 19 शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऍग्रीस्टॅक नोंदणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी. आगामी काळात ई-पंचनामा पद्धत लागू होणार असल्याने ऍग्रीस्टॅक नोंदणी सर्व खातेधारक शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासनाच्या आपत्ती मदत प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशा संघवी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सौर जलतापक उपकरणास इन्स्पॉयर अवॉर्डमध्ये विजेता उपकरणाची राज्यस्तरावर निवड

Next Post

अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

Next Post
अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

November 21, 2025
नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग

November 21, 2025
अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल : उत्तम जाधव

November 21, 2025
नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान,ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

November 21, 2025
श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सौर जलतापक उपकरणास इन्स्पॉयर अवॉर्डमध्ये विजेता उपकरणाची राज्यस्तरावर निवड

श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सौर जलतापक उपकरणास इन्स्पॉयर अवॉर्डमध्ये विजेता उपकरणाची राज्यस्तरावर निवड

November 21, 2025
राजकीय वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे भाष्य नको; पक्षश्रेष्ठींचे आदेश :  आ.चंद्रकांत रघुवंशी

राजकीय वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे भाष्य नको; पक्षश्रेष्ठींचे आदेश : आ.चंद्रकांत रघुवंशी

November 18, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group