नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी 75 रक्तदात्यानी रक्तदान केले.
बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त सिविल हॉस्पिटल व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर जिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे घेण्यात आले. या प्रसंगी 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी डॉक्टर नरेश पाडवी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उदघाटन केले या प्रसंगी डॉ. रमा वाडीकर, डॉ. रणजीत पावरा, डॉ. आशिष राऊत, डॉ. शामकांत पथरवात, डॉ. कमलाकर चौरे, श्री. विनायक गावित उपस्थित होते.तसेच या शिबिरासाठी
डॉ. जयदीप वळवी, डॉ. निलेश पावरा यांनी विशेष प्रयत्न करून शिबीर यशस्वी केले.







