नंदुरबार l प्रतिनिधी
निवडणुकीच्या काळात शिवसैनिकांनी एकमेकांना साथ देऊन आपापसातील विश्वास व्यक्त करीत कुठल्याही प्रलोभनांना ग्रामस्थांनी बळी पडू नये. पक्षाकडून ज्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट देण्यात त्यास सर्वांनी मदत करावी.राजकारण करीत असताना भाऊबंदकी कायम ठेवा असा सल्ला शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसैनिकांना दिला.दरम्यान,शनिमांडळ गावात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत असंख्य ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला.
शनिमांडळ ता.नंदुरबार येथे शिवसेना शिंदे गटाची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्या प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी साडेसाती मुक्तपीठ असलेल्या शनिदेव मंदिरात जाऊन अभिषेक अन् महाआरती केली.यावेळी आ.रघुवंशी म्हणाले, गेल्या निवडणुकीत आपल्या अनेक उमेदवारांना थोड्याशा फरकांनी पराभव पत्करावा लागला. आपण ज्या दिवसापासून राजकारणात आलो त्या दिवसापासून शपथ घेऊन जनतेची निस्वार्थ सेवा केली. हीच परंपरा यापुढेही कायम पुढेही चालू राहील. राजकारण करीत असताना भाऊबंदकी कायम राहायला पाहिजे.
आपण सर्व जातीवादाविरोधात आहोत. शिवसेनेने कधीही जातिवाद केला नाही. एखादा व्यक्ती काम घेऊन आला असता त्याला त्याची कधीही जात न विचारता सरळ हस्ते मदत केली. माणुसकी हीच आपली जात अन् धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी उद्योगपती मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, जि.प सदस्य देवमन पवार,बाजार समिती सभापती दीपक मराठे,बाजार समिती माजी सभापती रोहिदास राठोड, माजी जि.प सदस्य भरत पाटील, किशोर पाटील,नवीन बिर्ला,कमलेश महाले,हिंमतराव पाटील,संतोष धनगर, बाजार समिती संचालय ठाणसिंग राजपूत ,विकासो चेअरमन नामदेव पाटील,रावण पाटील विठ्ठल पाटील,जितेंद्र पवार,सुधीर पाटील,संजय पाटील,अशोक पाटील,संजय सूर्यवंशी,महेंद्र पाटील,मधुकर पाटील,साहेबराव पाटील,भास्कर पाटील,शिवाजी पाटील,हिरामण माळी, कृष्णा राजपूत, कृष्णा धनगर,सुनील राजपूत,नागू पाटील,कल्पेश सावंत,शामराव पाटील,गोविंद माळी,संतोष बोरसे, गोरख धनगर,गौतम ठाकरे, दिलखुश पवार,शाळीग्राम पाटील, नारायण पाटील,गिरघर पाटील,अंकुश पाटील,माणिकराव पाटील उपस्थित होते.
आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शनिमांडळ गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना पक्षाच्या गमचा देऊन आ.चंद्रकांत रघुवंशी, ॲड.जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.