पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम
नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.१३ ऑक्टोंबर रोजी अभिष्टचिंतनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या मंडळ संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक मित्र परिवारातर्फे आज दि. १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता अभिष्टचिंतन कार्यक्रम होईल.
तसेच सकाळी ११ वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार पटेल सभागृहात प्राथमिक ते महाविद्यालयीन व खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. बुद्धिबळ स्पर्धा पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन श्री. बापूसाहेब वाढदिवस सत्कार समितीने केली आहे.