नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात वायुसेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त कमांडर शशिकांत मराठे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, संचालिका ईलाताई गावित, आदिवासी युवक क्रीडा कल्याण मंडळाच्या सचिव डॉ.विभूतीताई गावित, तसेच आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ऋषिका गावित यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात आजपर्यंत भारताच्या संरक्षण क्षेत्रात वायुसेनेतील ज्या वीर सैनिकांनी आपले योगदान दिले व देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाले त्यांना कमांडंट व प्राचार्य यांच्यामार्फत रीथ अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल व प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनात वायुसेनेतील शहिदांना मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी कमांडंट शशिकांत मराठे यांनी सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली. तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती व देशभक्ती याविषयीची माहिती सांगितली. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, देशप्रेम,स्वच्छता, आरोग्य,राष्ट्रभक्ती याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन हे शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल व प्रवीण मोरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती रजनी करेले यांनी केले. याप्रसंगी शाळेतील प्राचार्य,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.