ओला दुष्काळ जाहीर करा,शिवसेना उबाठातर्फे मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिवसेना उबाठा पक्ष्यामार्फत देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हयात मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी होत असुन हाता तोंडाशी आलेले शेतकऱ्यांचे पिक हे मातीमोल झाले आहे. ठिकठिकाणी शेतात पाणी घुसले असुन केळी, उस, पपई, कापुस, सोयाबीन, मुंग, मका, उडीद हे सर्व पिक वाया गेले आहे त्यात शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर कर्ज बाजारी झालेला आहे त्यांचे घर व परिवार कसा सांभाळावा हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठेकलेला आहे त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे.
तरी नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना ताबडतोब ५०,०००/- नुकसान भरपाई त्यांचे खात्यावर जमा करण्यात यावी त्याची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी सांगितले होते की, आम्ही सरकार स्थापन करु त्या दिवशी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करु असे सांगितले होते तर आता वेळ आलेली आहे शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा करुन मिळावा हि नम्र विनंती.
जर ओला दुष्काळ जाहिर केला नाही व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर दिली नाही तर शिवसेना (उबाठा) पक्षा तर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात तालाठोक व तीव्र रस्तारोको आंदोलन करु मग होणाऱ्या परिणामास आपण स्वताः जवाबदार राहाल याची नोंद घ्यावी. या मागणीचे निवेदन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले यावेळी शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी, नाना पाटील, निंबा माळी, वासुदेव पाटील, चेतन पाटील, सुरेश घाटे, युवराज माळी, निंबा पटेल व शेतकरी उपस्थित होते