नंदुरबार l प्रतिनिधी-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील कोळदे येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन आश्रमशाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी क्रांतिकारकांचा ज्वाजल्य इतिहास माहिती व्हावा, आदिवासी संस्कृतीची जपवणूक होऊन विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी सदर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी क्रांतिकारकांचे कार्य,त्यांचा संघर्ष आणि इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा यासाठी दि.८ रोजी प्रदर्शनी भरविण्यात आली होती.यास इयत्ता पहिली तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. दि.१० रोजी प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तर अशा तीन गटात आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवन पटावर प्रश्न मंजुषा घेण्यात आली.यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला तर राष्ट्र उभारणी व स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थांनी सहभाग नोंदवत मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम संस्थेचे चेअरमन आ.चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी व सर्व संचालक तसेच कार्यालय अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी,प्राचार्य शैलेंद्र जे.रघुवंशी व मुख्याध्यापक आय. एन. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. याप्रसंगी निलेश पाटील, राकेश पाटील, विनोद कुंभार, प्रफुल्ल चौधरी, मनिषा गावित, भावना जाधव, चेतना पाटील, जयश्री साळुंखे, भारती भामरे,हेमराज पाटील, शुभम परदेशी, भूषण शिंदे,ललित माळी, पंडित कोकणी, सुरेंद्र पवार, स्वप्नील सामुद्रे, संदीप पाटील, राजू अहिरे, दिनेश मराठे, आर.आर.शेख, ए.ए.भामरे उपस्थित होते.यशस्वितेसाठी नंदकिशोर पाठक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.