अक्कलकुवा- धडगाव तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा तात्काळ भरण्याची राष्ट्रवादीची मागणी
धडगाव l प्रतिनिधी
अक्कलकुवा- धडगाव तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन
ड्रेस आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सातपुड्यातील आदिवासी भागातील अक्क्ककुवा-धडगाव,नंदुरबार तालुक्यातील आरोग्यसेवेतील अनेक पदे रिक्त असल्याने इथल्या रुग्णांना फटका बसतो. कधी इथल्या रुग्णांना रस्ताअभावी पायवाटेत मार्ग काढत रुग्णांना,गर्भवती महिलांना बांबूच्या झोळीतून आरोग्यकेंद्रा-सरकारी दवाखान्या पर्यन्त पोहचावे लागते.परंतु बऱ्याच वेळा इथल्या अपुऱ्या यंत्रसामुग्री अभावी अथवा अपुऱ्या आरोग्य कर्मचारीमुळे जिल्हा रुग्णालय नंदुरबारला रेफर केले जाते.परंतु धडगाव -मोलगी -अक्कलकुवा ते नंदुरबार जिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी जास्तीचे अंतर असल्याने बऱ्याचदा गर्भधारित महिलांना,गंभीर रुग्णांना,स्नेक बाईटच्या रुग्णांना वाटेतच घाटात जीव गमवावा ही शोकांतिका आहे,
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही ८७ वर्षानंतर आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे तो बदलला पाहिजे, आदिवासी समाज हा देशाचा मुळ मालक आहे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे याची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी निवेदनाद्वारा मागणी केली आहे.यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रणय पाटील,काॅग्रेस पक्षाचे दत्तु पवार सह आदी उपस्थित होते.