नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आसान येथील शिंदे शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या कार्या शैलीवर अन विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवत नंदुरबार तालुक्यातील घोटाणे गावातील शिवसेना शिंदे गटाचे माजी सरपंच सुभाष गोसावी माजी उपसरपंच ब्रिजलाल धनगर दशरथ भाया सोसायटी चेअरमन राजू गोसावी माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा बावा देवपुरी गोसावी मोतीलाल गोसावी अनिल गोसावी.
राजू गोसावी कैलास गोसावी उमेश गोसावी, वामन कैलास बावा, श्याम गोसावी, आप्पा गोसावी,प्रकाश गोसावी, अरविंद गोसावी, कालू गोसावी, सुदाम गोसावी, श्यामराव गोसावी, बटू गोसावी, राजू गोसावी, केदार गोसावी, पावबा गोसावी, संतोष गोसावी, साहेबराव गोसावी, विनोद गोसावी,लहू गोसावी, दगडू गोसावी, रामपुरी गोसावी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सायंकाळी सातच्या सुमारास भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील सोमूभैया गिरासे गोसावी मुन्ना दादा पाटील समाज अध्यक्ष अमोल भारती सरपंच सचिन धनगर उपसरपंच भीमराव गोसावी तुकाराम धनगर दीपक बच्छाव निलेश धनगर डॉ प्रवीण धनगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.