शिवसेना शिंदे गटाचा शहादा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
शहादा l प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचा तालुका व शहरात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असुन,त्यात तालुका प्रमुखपदी मनलेश जायसवाल,शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना नियुक्तीपत्र संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.
शिवसेना मुख्य नेते उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या मान्यतेने नियुक्त पत्र संपर्क प्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबार येथील आमदार कार्यालयात देण्यात आले.
यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व शिवसेनेचे कार्य तळागाळातील सामान्य जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, उपजिल्हा प्रमुख डॉ.राजेंद पेंढारकर,माजी नगरसेवक सुपडू खेडकर, माजी नगर सेवक दीपक दिघे,रवी जमादार,माजी नगरसेवक हिरालाल अहिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती छोटू भाई पाटील,राजरत्न बिरारे,हितेंद्र वर्मा,विजय गायकवाड,अँड.भोजेंद्र शिंदे,छगन तडवी,जयसिंग ठाकरे,एकनाथ ठाकरे,नितीन चौधरी अशोक वसावे योगेश कोठारी,महेश पाटील,धनराज जायसवाल प्रवीण सैदांणे,प्रवीण बोरदेकर,मनोज पाथरवट,अभय जैन,जैकी शिकालीकार ,राजु देसाई,योगेश शर्मा,मनोज सोनवणे,गोपाल कोळी,बाळासाहेब सुर्यवंशी,विपुल अहिरराव, दिलीप पवार सह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.