नंदुरबार l प्रतिनिधी
लायन्स क्लब नंदुरबार व एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत “एक पेड माँ के नाम” या केंद्र शासनाचा मोहिमेअंतर्गत शाळेमध्ये वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले,कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले.पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली,यावेळी व्यासपीठावर डॉ.राजेश वसावे,पंकज पाठक( मुख्याध्यापक डीआर हायस्कूल),सतीश चौधरी(झोन चेअरमन),शेखर कोतवाल(माजी अध्यक्ष),दिनेश वाडेकर(क्लब सचिव),डॉ. चेतन बच्छाव(क्लब खजिनदार),राहुल पाटील (ज्येष्ठ क्लब सदस्य) उप मुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी आदी उपस्थित होते, या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार शाळेचा प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांचा हस्ते गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना नूतन पाटील यांनी केली व पर्यावरणाबद्दल सविस्तर माहिती मुलांना सांगितली यावेळी प्रज्ञा पावरा हीने मनोगत व्यक्त करताना उपस्थित मुलांना पर्यावरणाबद्दल माहिती कार्यक्रमाचे महत्त्व पटवून सांगितले या उत्कृष्ट भाषणाबद्दल डॉ.राजेश वसावे यांनी पाचशे रुपये व राहुल पाटील यांनी शंभर रुपये रोख बक्षीस दिले.डॉ. राजेश वसावे यांनी आपल्या भाषणात झाडे नसल्यास पृथ्वीवर आजाराचे प्रमाण वाढेल आज काँक्रीटच्या जंगलांमुळे झाडे झाडांची कत्तल झाली त्यामुळे ओझोनचे सुद्धा प्रचंड नुकसान असून पृथ्वीवरील तापमानाचे प्रमाण वाढले आहे.
शासनाने सुरू केलेल्या एक पेड माँ के नाम याचा उद्देश आईचा आदर व सन्मान राखून प्रत्येकाने एक झाड लावावे असे आवाहन केले. इयत्ता आठवीची विद्यार्थिनीने ओला व सुका कचरा व्यवस्थापनाचे संदेश देणारी नाटिका विद्यार्थ्यांसमोर सादर केली कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या वेशभूषा परिधान करून “वृक्ष संवर्धनाची” उत्कृष्ट अशी नाटिका सादर केली.प्लास्टिक संवर्धन नृत्याचे सादरीकरण देखील विद्यार्थ्यांचा मार्फत करण्यात आले . यावेळी ओला व सुका कचरा व्यवस्थापन कसा करावा याबद्दल तेजस्विनी पाटील या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांसमोर महत्वपूर्ण माहिती सादर केली.इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा या नाटिकेमध्ये “न काटो मुझे बडा दुखता है”! या अभिनयाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.झाडाचे वातावरणातील योगदान तापमान नियंत्रक म्हणून उत्कृष्ट कार्य वृक्ष करतात याबाबत तनिष्का बोधगावकर हीने विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देत वैष्णवी कदम या विद्यार्थिनींने आपल्या भाषणांमध्ये वृक्षाचे उपयोग तसेच प्रत्येकाने आयुष्यात एक झाड लाववून निसर्गाची हानी न करता मदत केली पाहिजे असे आवाहन केले.
सीमांतनी चौधरी या विद्यार्थिनीने “चलो मिलके लेते है कसम” या उत्कृष्ट गायनाचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन मूल्य सर्व मनुष्यवर्गामध्ये रुजल पाहिजे तसेच झाडे लावून आईच्या आणि भारत मातेच्या सन्मानार्थ आदर भाव राखला पाहिजे असे आव्हान केले.या आयोजना करीता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.