नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचालित द फ्युचर स्टेप स्कूल, भालेर येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भालेरच्या सरपंच सौ. कविता चंद्रशेखर पाटील उपस्थित होत्या. तसेच वडबारे येथील पालक मच्छिंद्र राजेंद्र पाटील व काकरदे येथील पालक विनायक महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अत्यंत भावनिक आणि भक्तिभावाने सामूहिक गुरु वंदना सादर केली.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली गुरुपौर्णिमा ग्रीटिंग कार्ड्स आणि भेटवस्तू आपल्या गुरुजनांना अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उमेश सोनवणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी द फ्युचर स्टेप स्कूलचे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.