Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

team by team
July 7, 2025
in राजकीय
0
महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांचा हेतू महाराष्ट्राचे किंवा मराठी माणसाचे हित साधणे नसून, वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याचा डाव आहे. जनतेने वारंवार नाकारलेले, सर्वच ठिकाणी अपयशी ठरलेले दोघे भाऊ आता मराठी अस्मितेच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरा प्रश्न हा आहे की, जेव्हा यांनी स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिकवले, तेव्हा त्यांचा मराठी बाणा कुठे गेला होता? असा सवाल
प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केला आहे.

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की,बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वासाठी लढा दिला. पण राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेना सोडली, तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मांडीवर बसून बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार विकले. आता पुन्हा एकदा, सोनिया गांधींच्या आदेशाने, या ठाकरे बंधूंनी हिंदू समाजात फूट पाडण्याचे कारस्थान रचले आहे. “एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे” या विचाराने हिंदू समाज आज एकवटत आहे, पण हे ठाकरे बंधूंना सहन होत नाही. त्यामुळे हिंदू समाजात फुटीरतेचे बीज पेरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

वर्षानुवर्षे मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, पण या काळात मराठी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काय केले? मराठीच्या नावाखाली केवळ स्वतःची खिसे आणि घरे भरण्याचे काम या दोघांनी केले. सात पिढ्यांचे भले करून घेण्याचीच कामगिरी त्यांनी केली. मुंबईवर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या या नेत्यांनी मराठी माणसाच्या हितासाठी कधीच ठोस पावले उचलली नाहीत असेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

Next Post

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

Next Post
नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add